Junnar | गरिबांना मदत करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेला अटक, पत्नीचेही गंभीर आरोप |Sakal Media |

2021-09-04 5,038

बेवारस, बेघर, गरीबांना आपल्या घरी आणून सरकारच्या मदती शिवाय सेवा करणारा आणि त्यांचा सांभाळ करणाऱा अक्षय बोऱ्हाडे अडचणीत सापडलाय. जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक इथल्या शिवऋण प्रतिष्ठानचा अध्यक्ष अक्षय बोऱ्हाडे याच्यावर जुन्नर पोलिसांनी खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करत 2 दिवसांपूर्वी अटक केली. मात्र, आता या प्रकरणात त्याची पत्नी रूपाली बोऱ्हाडे सुद्धा पुढे आलीय. तिनेही अक्षयविरोधात तक्रार केल्यानं अक्षयच्या अडचणीत वाढ झालीय. अक्षयच्या पत्नीनं पती अक्षय, सासू सविता आणि दीर अनिकेत या सर्वांवर मारहाण केल्याचा आणि रिव्हॉलवरची आणि गुंडांची धमकी देऊन शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप केलाय. त्याचबरोबर प्रतिष्ठानसाठी आलेला निधी तो स्वतःच्या चैनीसाठी वापरल्याचाही आरोप केलाय. अक्षयचे अनेक मुलींसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोपही त्याच्या पत्नीनं केलाय. पत्नीनं दिलेल्या या तक्रारीवरून जुन्नर पोलीसांनी अक्षय विरोधात गुन्हा दाखल केलाय.
#akshayborhade #casefiled #junnar #maharashtra #marathinews #marathi
#sakal #sakalnews

Videos similaires